ई-पंचायत / संग्राम

भारत निर्माण कार्यक्रमातील नॅशनल ई-गव्हर्नमेंट कार्यक्रमांतर्गत सर्व पंचायत राज संस्थांचे संगणकीकरण करुन त्यांच्या कारभारात एकसुत्रता व पारदर्शकता आणण्यासाठी EPRI/ E - पंचायत हा मिशनमोड प्रोग्रॅम हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात हा प्रकल्प ' संग्राम प्रकल्प ' (संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) या नावाने राबविण्यात येत असून, या प्रकल्पांतर्गत सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायती यांचे संगणकीकरण करण्यात आले असून त्यांचा कारभार ऑनलाईन करण्यात आलेला आहे. उद्दीष्ट :-

  • पंचायत राज संस्थांच्या कारभारात एकसुत्रता व पारदर्शकता आणणे.
  • सर्व सामान्य ग्रामिण जनतेस त्यांच्या राहण्याच्या परिसरात सर्व शासकीय सेवा पारदर्शकता पध्दतीने त्वरीत उपलब्ध करुन देणे.

शासन निर्णय क्र.व्हीपीएम-2011/प्र.क्र.6/पंरा-3(संग्राम) दिनांक26 एप्रिल व 30 एप्रिल,2011 नुसार संग्राम प्रकल्प अंमलबजावणी आराखडा, हार्डवेअर,तांत्रिक मनुष्यबळ इत्यादी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येवून दिनांक 1 मे, 2011 पासुन अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली.

या प्रकल्पांतर्गत खालील प्रकारचे हार्डवेअर सर्व पंचायत राज संस्थांना पुरविण्यात आले आहेत :-