« Back
महालक्ष्मी सरस प्रदर्शन
- स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना/महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोनती अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता गटाच्या व स्वरोजगारींच्या उत्पादनाची प्रसिध्दी व विक्री मोठ्या प्रमाणावर व्हावी यासाठी मुंबई येथे दरवर्षी डिसेंबर महिन्यात सन 2003 पासून महालक्ष्मी सरस या नावाने व्यापक प्रमाणात विक्री प्रदर्शन भरविण्यात येते.
- या प्रदर्शनात सुरूवातीस 500 कारागिरांच्या सहभागापासून सुरूवात होऊन यावर्षी एकूण 1800 कारागिर सहभागी झाले होते.
- त्याचप्रमाणे विक्रीही रु.1 कोटी पासून वाढत जाऊन यावर्षी रु.7.25 कोटींची विक्रमी विक्री झाली.
- स्वयंसहायता बचत गटांना विनाशुल्क दुकानगाळे, उत्पादीत केलेल्या वस्तुंना जकात कर माफी, स्वरोजगारींची मोफत निवास व्यवस्था व प्रदर्शन स्थळ ते निवास व्यवस्थेपर्यंत ने-आण करण्याकरीता वाहतूक व्यवस्था या सुविधा दिल्या जातात.
मागील तीन वर्षांच्या प्रदर्शनांचा तपशिल :-
अनु क्र. | तपशिल | वर्ष | ||
---|---|---|---|---|
2010-11 | 2011-12 | 2012-13 | ||
1 | एकूण स्टॉल संख्या | 530 | 560 | 584 |
2 | सहभागी राज्ये | 23 | 22 | 23 |
3 | सहभागी कारागिर | 1,283 | 1632 | 1800 |
4 | एकूण विक्री (कोटी) | 4.06 | 5.15 | 7.25 |